Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवसाढवळ्या तरुणाची दगडाने हत्या

A young man was stoned to death in broad daylight in Satara
, शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (14:52 IST)
सातारा शहरातील दिव्यानगरी परिसरात दिवसाढवळ्या एका तरुणाची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला झालेल्या तरुणाला पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं पण उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
संतोष ऊर्फ विठ्ठल सुळ असं हत्या झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तरुण रस्त्यावरून जात असताना अचानक आलेल्या एका टोळक्यानं त्याचा रस्ता आडवला. तसेच त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्यानं आणि दगडानं मारहाण केली. 
 
पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! विवाहितेवर 31 वर्षे अत्याचार