Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुराच्या पाण्यात गिरणा नदीच्या पुलावरुन उडी मारून स्टंट करणारा तरुण बेपत्ता

Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2022 (17:48 IST)
सध्या राज्यात मुसळधार पावसाचा जोर सुरु आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून नदी नाल्यात पूर आले आहेत. सध्या नदी नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला असून कळवण, बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून धरणे भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. मालेगावात गिरणानदीला पूर आला आहे  मालेगावात नाशिक येथे गिरणानदीच्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणे एका युवकाच्या अंगाशी आले आहेत. या तरुणाने पूर आलेल्या गिरणानदीत उडी घेतली आणि आता हा तरुण बेपत्ता झाल्याचे वृत्त मिळाले आहे. या तरुणाचा शोध घेतला असून अद्याप तो सापडला नाही. गिरण नदीच्या पुलावरून तरुणाने उडी घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणाचे नाव नईम अमीन असून तो मालेगावात राहत असल्याचे समजले आहेत. रात्री अंधार झाल्यामुळे त्याचा शोध लावता आला नाही. सकाळी त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरु झाले असून अद्याप तो सापडला नाही. 
 
 हा तरुण उडी मारल्यावर  बेपत्ता झाला असून त्याचा अद्याप शोध लागला नाही. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पूर्वी देखील अनेकांनी पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करत आपला जीव गमावला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

पुढील लेख
Show comments