Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेयसीसह स्वतःला पेटवून घेणाऱ्या तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad   A young man  Death  who set himself on fire  With Girlfriend
, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (15:49 IST)
प्रेमप्रकरणामधून तरुणाने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेत तरुणीला मिठी मारल्याने दोघेही गंभीर भाजल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. 21) औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समोर घडली होती. या घटनेमध्ये भाजलेल्या तरुणाचा अखेर रात्री 10 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गजानन खुशालराव मुंडे (२९, रा. लोणर, ह.मु. पीएचडी वसतिगृह, विद्यापीठ) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरूण 95 टक्के भाजला होता. तर तरुणीवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून, ती देखील गंभीर जखमी झाली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमप्रकरणामधून गजाजन साळवे याने शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या इमारतीतील जैवभौतिकशास्त्र विभागामध्ये सोमवारी पेट्रोल अंगावर ओतून घेत स्वतःला पेटवून घेतले होते. यावेळी पूजा साळवेच्या अंगावर देखील पेट्रोल टाकून तिला देखील त्याने मिठी मारली होती. यामध्ये दोघे देखील गंभीर भाजले होते. गजाजन 95 टक्के, तर पूजा 45 टक्के भाजली होती. तर गजाननची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान रात्री 10 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी गजानन आणि त्याच्या आई-वडिलांवर बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर ‘तु गजाननशी लग्न कर नाहीतर आम्ही जिव देवु अशी धमकी गजाननच्या आई-वडिलांनी मुलीला दिली असल्याचा उल्लेख पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक मुंबई महामार्गाबाबत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली “ही” मागणी