Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अतिवृष्टीनं शेतीचं प्रचंड नुकसान, पालकमंत्र्यांनी केली पाहणी

aalandi
, शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (17:08 IST)
अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचचे मोठ्या प्रमाणात नकसान झाले आहे. यामध्ये आळंदी येथील फुलगाव मधील शेतकरी प्रभाकर खुळे यांच्या शेतातील कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. 
 
अचानक आलेल्या अवकाळी पावसाने डोंगरावरील तसेच परिसरातील शेतातील पाणी मोठ्या प्रमाणात प्रभाकर खुळे यांच्या शेतात घुसले. त्यांच्या एक हेक्टर शेतीच्या क्षेत्रात कांदा पिक लावण्यात आले होते. जमा झालेल्या पाण्याने दीड महिन्यांचे कांद्याचे पीक अक्षरश: मुळासकट पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. पीक वाहून गेल्याने सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रभाकर खुळे पाटील यांनी केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा पहिला क्रमांक; पालकमंत्री छगन भुजबळ