Publish Date: Fri, 14 Dec 2018 (16:47 IST)
Updated Date: Fri, 14 Dec 2018 (16:49 IST)
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवार, १३ डिसेंबर रोजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. निरुपम यांनी १० नोव्हेंबरला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांच्यावर अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून आरोप केले होते. आंतरराष्ट्रीय तस्करांशी मुनगंटीवार आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे निरुपम यांनी म्हटले होते. त्यावर सुधीर मुंगटीवार यांनी हा दावा ठोकला आहे.
मुनगंटीवार यांच्यासह भाजप नेत्यांचे तस्करांशी संबंध आहेत. त्यातून अवणीची हत्या झाल्याचा आरोप निरुपम यांनी केला होता. तसेच त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात जंगलकटाई झाल्याचे निरुपम यांनी म्हटल्याचे मुनगंटीवारांचे वकील शुकुल यांनी सांगितले.