Dharma Sangrah
✕

बीडमध्ये मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांची कार ट्रकला धडकली; इंदापूर येथील आंदोलकाचा मृत्यू

वेबदुनिया न्यूज टीम
सोमवार, 1 जून 2026 (12:34 IST)
बीडच्या मंजरसुंबा येथील मराठा आंदोलनातून परतणाऱ्या कार्यकर्त्यांना ट्रकने धडक दिली. रामचंद्र जामदादे यांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहे.  
ALSO READ: भंडारा : रामटेक-तुमसर रस्त्यावर ट्रक आणि बोलेरो यांच्या धडकेत २ ठार तर १२ जण गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर विविध जिल्ह्यांतील आंदोलक आणि कार्यकर्ते आपापल्या गावी परतत होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कार्यकर्तेही कारने परतत होते. मध्यरात्री, बीड-अहमदनगर महामार्गावरील मंजरसुंबाजवळ, त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका अवजड ट्रकच्या मागच्या भागाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की रामचंद्र जामदादे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचे इतर दोन साथीदार, संतोष माने आणि बिपिन मोरे, हे देखील गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमींना तातडीने बीड येथील एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
ALSO READ: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहाटे भीषण अपघात! ट्रक, कंटेनर आणि एर्टिगा कार यांच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

LIVE: मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग

मुंबईतील अँटॉप हिल येथील म्हाडा फ्लॅट् बांगलादेशी घुसखोरांनी बळकावल्याचा आरोप, किरीट सोमैया यांची चौकशीची मागणी

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर गोळीबार

धरणात अंघोळ करताना वडील आणि दोन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नाशिकमधील घटना

मंत्री गणेश नाईक यांच्या पवनगड येथील बंगल्याला आग लागली, दीड तासात आगीवर नियंत्रण

पुढील लेख
Show comments