Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अपघात:महिला बाइक रायडरचा माहूरला जाताना मृत्यू

Webdunia
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (17:27 IST)
सातारा येथून माहूरला रेणूकामातेच्या दर्शनासाठी जात असलेल्या हिरकणी बाईक राईड ग्रुपच्या शुभांगी संभाजी पवार (३२) यांचा भोकरफाटा येथे टँकरच्या चाकाखाली येवून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता.१२) सकाळी १० च्या सुमारास घडली.
 
शुभांगी या सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या महिला बाईक राईड करत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघाल्या होत्या.  
 
 डोक्यावरुन टँकर गेल्याने मृत्यू
सातारा येथील हिरकणी ग्रुपच्या नऊ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी एक हजार ८६८ किमी प्रवासासाठी मोटार सायकलने नवरात्रोत्सवात आदिशक्तीच्या साडेतीन आशक्तीपिठांचे दर्शन घेण्यासाठी मोटारसायकलवर निघाल्या होत्या. त्यांनी कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन ते तुळजापूर पोहोचल्या. आई तुळजाभवानीचे दर्शन करून पुढील माहूरगडात रेणुकामातेच्या दर्शनासाठी जात असताना भोकरफाटा दाभड येथे शुभांगी पवार यांची मोटारसायकल क्रमांक (एम.एच.११ सी.ए.१४४७) स्लीप झाली. त्याच वेळी पाठिमागून आलेला टँकर क्रमांक (जि.जे.१२ ए. टी. ६९५७) च्या खाली वाहन येऊन पाठीमागील चाकाखाली चेंगरुन शुभांगी यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे डोक्यावर असलेले हेल्मेट शरिरापासून वेगळे होवून पडले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

शाळेतून घरी परतताना मधमाशीच्या हल्ल्यात चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू

असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले

उद्धव ठाकरेंचे पंतप्रधानमोदींना प्रत्युत्तर म्हणाले -

पाकिस्ताच्या सीमेवर दहशतवादी हल्ला, पाच इराणी सुरक्षा जवान शहीद

भारतीय संघाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना, यशस्वी-सिराज संघात

पुढील लेख
Show comments