Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक-मुंबई महामार्गांवर अपघात; दोघांचा मृत्यू, 2 जखमी

Accidents on Nashik-Mumbai highways; Two killed
, बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (13:21 IST)
नाशिक-मुंबई महामार्गांवरील वेहलोली जवळ ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. 
 
एक ट्रक भरधाव वेगात मुबईकडे जात असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील वासिद जवळील वेहलोली गावानजीक ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकने कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
 
पप्पू दशरथ भोईर (वय-22, रा. वेळूक कसारा) असे त्याचे नाव होते. तर त्याच्यासोबतचा मित्र गंभीर जखमी झाला. दुचाकीला धडक देऊन पुढे गेलेला हा ट्रक महामार्गाच्या लगताच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. ट्रकखाली दबून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. 
 
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने मदतकार्य सुरू केले. अपघतातील दुचाकीवरील जखमी व्यक्तीला शहापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल केले गेले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

9 राज्यांत डेंग्यूचा उद्रेक, राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली