Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक-मुंबई महामार्गांवर अपघात; दोघांचा मृत्यू, 2 जखमी

Webdunia
बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (13:21 IST)
नाशिक-मुंबई महामार्गांवरील वेहलोली जवळ ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. अपघातात 2 जण जखमी झाले आहेत. 
 
एक ट्रक भरधाव वेगात मुबईकडे जात असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील वासिद जवळील वेहलोली गावानजीक ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रकने कल्याणकडे जात असलेल्या दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 
 
पप्पू दशरथ भोईर (वय-22, रा. वेळूक कसारा) असे त्याचे नाव होते. तर त्याच्यासोबतचा मित्र गंभीर जखमी झाला. दुचाकीला धडक देऊन पुढे गेलेला हा ट्रक महामार्गाच्या लगताच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. ट्रकखाली दबून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. 
 
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमने मदतकार्य सुरू केले. अपघतातील दुचाकीवरील जखमी व्यक्तीला शहापूर उपजिल्हा रुग्णाल्यात दाखल केले गेले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पौराणिक कथा : द्रौपदी और भीष्म पितामह

या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊ शकतं, पिण्यासाठी योग्य वेळ देखील जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025

Shardiya Navratri 2025 या वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होईल, अष्टमी, नवमी आणि दसरा कोणत्या दिवशी ?

गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित

सर्व पहा

नवीन

जर विश्वासघात झाला तर... जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीस यांना इशारा दिला, १ महिन्याचा अल्टिमेटम दिला

LIVE: मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण, १० हजार कर्मचारी तैनात, २९० कृत्रिम तलावांची व्यवस्था

मुंबईत गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण, १० हजार कर्मचारी तैनात, २९० कृत्रिम तलावांची व्यवस्था

पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाही, पतीने डोक्यात हातोड्याने वार करून हत्या केली

महापालिका निवडणुकांबाबत सस्पेन्स: पक्ष युतीने लढतील की एकटे, संभ्रम कायम

पुढील लेख
Show comments