Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुल्क भरण्यासाठी तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई होणार

action taken
, शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020 (08:44 IST)
लॉकडाऊनच्या कालावधीत शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी पालकांना सवलत द्यावी असे  महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. राज्य शासनाचे आदेश डावलून बोरिवली पश्चिम येथील ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलसह अनेक शाळांनी शुल्क वाढ केली आहे. त्याचबरोबर काही शाळांनी शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला असून, शुल्क न भरल्यास ऑनलाईन वर्गात बसण्यास मुलांना परवानगी देत नसल्याच्या तक्रारी युवासेनेला प्राप्त झाल्या आहेत.

या तक्रारींची दखल घेत युवासेना सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी शुल्कासाठी तगादा लावणार्‍या शाळांची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता 'ही' कॉलर ट्यून बंद करा, मनसे केली मागणी