शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले त्याविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनी प्रसारमाध्यमांसमोर चर्चेला या. दोघं एकत्र चर्चेला सामोरं जाऊ, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर अनेक आरोपही केले आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज पुन्हा एकदा चॅलेंज देतो कारण मला इतरांकडून उत्तर अपेक्षित नाहीय. त्यामुळे मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देतो की, मीडियासमोर माझ्यासोबत वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा करायला या”
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, गेल्या दोन महिन्यात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर पत्रकार परिषद. गेल्या अनेक दिवसात कुठेही उत्तर न देता कारभार सुरु. मंत्री महिलांना अपशब्द तरी कारवाई नाही. नुसत्या घोषणा. कायदा सुव्यवस्था रसातळाला. वेदांता फाॅक्सकाॅन महाराष्ट्रात येणार होता.कमी विकसित क्षेत्रात गेला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तो येणार असे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री खोटे बोलले. माहिती अधिकारात एका दिवसात उत्तर आले. आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली त्याला एक दीड महिना लागला. तो आपल्याकडे येणार याचा आज पुरावा देणार.
५ सप्टेंबर २०२२ चे पत्र अनिल अग्रवालांना एमायडीसीचे महाव्यवस्थापकांचे. त्यात एमोयु करण्यासाठी येण्याची विनंती. सभागृहात पण मुख्यमंत्री बोलले. पत्रात सबसिडी, सुविधांचा उल्लेख. पुढे जाण्यासाठी मी आपणाला मुंबईला तुमच्या सोयीची तारीख निश्चित करण्यासाठी आमंत्रित करतो आहे. मी तुम्हाला भेटण्यासाठी आतुर आहे असा पत्रात उल्लेख.
२९ /०८/२०२२ रोजी जी दुसरी बैठक झाली उपमुख्यमंत्र्यांची ती वेदांता याच राज्यात होण्यासाठी होती की गुजरातला देण्यासाठी होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती का? खोट कोण बोलत आहे उपमुख्यमंत्री का उद्योग मंत्री. माझ पुन्हा त्यांना आव्हान देतो चर्चा करण्याची. नुसते आरोप केल्या जातात. परत परत हे का बोलतोय कारण कालच २८ तारखेला तीन वर्ष झाले असते. साडेसहा लाख कोटींची मविआची गुंतवणूक आणली. दावोस मधून गुंतवणूक आणली. आज दुख खोके सरकार कारण शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी तुम्ही काम करणार की नाही? असा थेट सवालही आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor