फोटो साभार -सोशल मीडिया
जळगाव जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची पंचवार्षिक मुदत २० मार्च राेजी संपली आहे. साेमवारपासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांची शासनाकडून प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. साेमवारपासून निवडणूक हाेईपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासकांचे नियंत्रण असेल.
जिल्हा परिषदेची पंचवार्षिक मुदत संपली असून, निवडणुका न झाल्याने आता जिल्हा परिषदेवर पदाधिकाऱ्यांची सत्ता, अधिकार संपुष्टात आले आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापतींना त्यांची दालने, वाहने आणि निवासस्थाने साेडावी लागणार आहेत. रविवारी या पदाधिकाऱ्यांचे पदासाेबत मिळालेले कायदेशीर अधिकार संपुष्टात आले. साेमवारी अध्यक्ष आपला पदभार मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पंकज आशिया यांच्याकडे देतील.