Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्यादानानंतर पित्याचा मृतदेह तलावात आढळला

Webdunia
बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (20:16 IST)
मुलीला कन्यादानानंतर सासरी पाठवणाऱ्या घरात शोकाचे वातावरण निर्माण झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या वाळूज महानगरात घडली आहे. साजापुरच्या तलावात मुलीच्या पित्याचा मृतदेह आढळल्याने सासर आणि माहेरी खळबळ उडाली आहे. 
 
समीर चांदशाह असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत समीर हे पत्नी शाहिनबी आणि मुलगा साहिल आणि मुलगी सानिया यांच्यासह साजापुरात वास्तव्यास होते. समीर हे मुळात चांदवड जिल्हा नाशिक चे असून साजापुरात कामानिमित्त आले आणि स्थायिक झाले. ते वाहन चालक असून पडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचे. त्यांनी आपल्या मुलीचे सानियाचे लग्न समीर शेख या तरुणाशी 18 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात लावून दिले. नंतर मुलीच्या सासरी रिसेप्शन असल्यामुळे समीर चांद शाह कुटुंब मुलीच्या सासरी ढोरकीन ला रविवारी गेले. नंतर ते सर्व परत आले. लग्नाचा थकवा असल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक हे झोपी गेले.

सकाळी उठल्यावर समीर चांद शाह हे घरात दिसले नाही. कुटुंबीयांनी  त्यांच्या मोबाईलवर फोन लावला पण त्यांनी फोन बंद केला होता. कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा खूप शोध घेतला. तरीही ते सापडले नाही. मंगळवारी साजापूरच्या तलावात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याचे काही लोकांनी वाळूज पोलिसांना कळवले. नंतर अग्निशमन दलाने पाचारण करून मृतदेह तलावातून बाहेर काढले. नंतर त्याच्या जवळच्या कागदपत्रावरून ते मृतदेह समीर शाह चे असल्याचे समजले. 

समीरच्या कुटुंबियांना हे समजतातच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेमुळे सासर आणि माहेरच्या गावात शोककळा पसरली आहे. समीरने असे का केले या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. वाळुंज पोलीस ठाण्यात हे प्रकरण नोंदवले असून पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

भाजपवर टीका करतांना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंची जीभ घसरली

आदर्श आचारसहिंता लागू असतांना नवी मुंबईत कोट्यवधींची रोकड जप्त

मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबल्या गेल्याने एका मुलीसह 4 महिलांचा मृत्यू

काँग्रेसवर निशाणा साधत रामदास आठवलेंनी जातीवादी राजकारणाचा गंभीर आरोप केला

कंटेनर आणि इनोव्हा कारच्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments