Marathi Biodata Maker

पुन्हा पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांनो घ्या काळजी

Webdunia
मंगळवार, 7 जानेवारी 2020 (11:01 IST)
येत्या ७ ते ९ जानेवारी या दरम्यान पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या लगतच्या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो.पुढील आठवड्यात उत्तर-भारतातातून पश्चिम दिशेकडे वारे वाहणार आहेत. त्याच्या प्रभावामुळे हवामानात अस्थिरता निर्माण होऊन विदर्भातील बऱ्याच भागात ढगाळ हवामान आणि मेघ-गर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज आहे.
 
दरम्यान नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील बऱ्याच भागात तर, अमरावती, यवतमाळ, नांदेड, अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात (प्रामुख्याने पूर्व तालुक्यांमध्ये) मेघ-गर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व-विदर्भात काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येणार नाही. पावसाचे प्रमाण आणि शक्यता ८ तारखेला अधिक राहिल तर, ९ तारखेला पावसाचे प्रमाण कमी होऊन पूर्व-विदर्भातच पावसाची शक्यता राहिल, असे मत देखील व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा आणि खानदेशासह मध्य-महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहील. शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

नवीन

सततच्या पावसामुळे पिकांवर रोगांचा धोका; कृषी तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा

समुद्रातील मोठी दुर्घटना! दोन बोटी बुडाल्या; ५०० जण मृत्युमुखी पडले

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! २४ व्या हप्त्याचे २,००० रुपये 'या' तारखेला जमा होऊ शकतात

E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब झाल्यामुळे ग्राहक न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय: कंपनीला नवीन कार देण्याचे आदेश!

LIVE: नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेऐवजी 'राम रक्षा आंदोलन' आणि 'महाआरती'

पुढील लेख
Show comments