Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासना कडून मदत मंजूर;

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (09:03 IST)
जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून, २०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास राज्य शासनाने मंजूरी  दिली आहे.  याबाबतचा शासन निर्णय २६  फेब्रुवारी २०२४  रोजी निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना  मदत व दिलासा मिळेल, असे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.
 
जळगाव जिल्ह्यात जून, २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीटीमुळे ३ हजार ८५६ बाधित शेतकऱ्यांच्या २ हजार ३९०.०८ हेक्टरवरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित केल्याचे  मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments