Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीड जिल्हा परिषदेतील पराभवास कारणीभूत असलेल्यांवर राष्ट्रवादी नेतृत्वाकडून लवकरच कठोर कारवाई

ajit panwar
, बुधवार, 22 मार्च 2017 (22:18 IST)
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणाऱ्यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल, अशी माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीने झटत असताना व त्यांच्या परिश्रमांवर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना पक्ष उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते व मतदारांच्या जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात पक्षभावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, अशा पक्षविरोधी कारवाया कदापीही सहन केल्या जाणार नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एप्रिल पासून गोदावरी प्रदूषण करणाऱ्याना दंड