महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची तयारी पाहता राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठीची चढाओढ सुरूच आहे. दरम्यान, रविवारी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांनीही हजेरी लावली. या बैठकीनंतर अजित पवार थेट राजभवन पोहोचले. अजित पवार हे एनडीएमध्ये सामील होणार असून त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठिंबा देणारे पत्र राज्यपालांकडे पोहोचवले असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकते.
<
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde reaches Raj Bhawan where NCP leader Ajit Pawar and other NCP leaders are present. pic.twitter.com/Bjjl2V6Pvg
— ANI (@ANI) July 2, 2023
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार राजभवनमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे समर्थक नेतेही उपस्थित आहेत.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा यावेळी राजभवनाकडे निघाले असून राज्यात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत होते. पण या बैठकीची कल्पना शरद पवारांना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीसही राजभवनात पोहोचले आहेत. वृत्तानुसार, राजभवनात पोहोचलेल्या अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आधीच उपस्थित आहेत. एनडीएला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवार आणि छगन भुजबळ सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. राष्ट्रवादीकडून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाऊ शकते.