Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अजित पवार मिश्किलपणे म्हणतात ......कारण, पावसात घेतलेल्या सभांचा आपल्याला फायदा होतो

ajit pawar
, बुधवार, 15 मार्च 2023 (21:39 IST)
निवडणुकीच्या प्रचारावेळी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी शरद पवार यांनी केलेलं पावसातील भाषण  लकी पाँईंट ठरला. त्यानंतर पावसातील भाषणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. याच पावसातील भाषणाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्फुल्लिंग चेतवलं. ऊन, पाऊस, वारा, असला तरीही सभा दणक्यात घ्या. कारण, पावसात घेतलेल्या सभांचा आपल्याला फायदा होतो, असं त्यांनी मिश्किलपणे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.
 
ऊन, पाऊस, वादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस काहीही असलं तरीही महाविकास आघाडीची सभा होणारच आहे. कोणत्याही आपत्तीमुळे सभा थांबणार नाही, असं सांगत असतानाच पावसात सभा झाली की फार फायदा होतो, असं म्हणत अजित पवारांनी हशा पिकवला. महाविकास आघाडीच्या नेत्यांची  वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये सभा होती. या सभेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर घेण्यात येणाऱ्या सभांचा आढावा घेण्यात आला.
 
अजित पवार म्हणाले की, २ एप्रिलपासून मोठ्या सभा घ्यायच्या आहेत. उद्धव ठाकरेंची खेडला ज्याप्रमाणे सभा झाली त्याचप्रमाणे मालेगावातही सभा होणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्याही सभा झाल्या पाहिजेत. त्यानुसार, २ एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. जिथं तिथं महाविकास आघाडीच्या महाप्रचंड सभा झाल्या पाहिजेत. या सभांचा परिणाम सर्वदूर झाल्या पाहिजेत. 
 
या सर्व सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे.२ एप्रिल रोजी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा होणार आहे. या सभेला अंबादास दानवे पुढाकार घेतील. तर, दुसरी सभा १६ एप्रिल रोजी नागपूर येथे सभा होणार असून सुनील केदार या सभेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तिसरी सभा महाराष्ट्र आणि कामगार दिन १ मे रोजी राज्याची राजधानी मुंबईत होणार आहे. या सभेचं प्रतिनिधित्व आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. चौथी सभा १४ मे रोजी पुण्यात होणार असून याचं प्रतिनिधित्व अजित पवारांकडे आहे. २८ मे रोजी कोल्हापूरला सभा होणार असून त्यासाठी सतेज पाटील पुढाकार घेतील. ३ जून रोजी नाशिकमध्ये सभा होईल. तर, यशोमती ठाकरू यांच्या नेतृत्त्वाखाली ११ जून रोजी अमरावतीला सभा होणार आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, दीपक सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश