Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार म्हणाले, दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल

Ajit Pawar
, गुरूवार, 4 मार्च 2021 (17:56 IST)
विधिमंडळाचं वरीष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेमध्ये गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन दिलं. यावेळी बोलताना त्यांनी करोनाची सविस्तर आकडेवारी आणि राज्य सरकारकडून यासंदर्भात केलेल्या आणि केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी अजित पवार म्हणाले, स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना करोना झाला नसल्याचं सांगतानाच दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल असं अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला!
 
राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्यातला मृत्यूदर सुदैवाने घटला आहे. करोना झाला तर बऱ्याच लोकांना हॉस्पिटलला जावं देखील लागत नाही. बरेच जण घरच्या घरी औषधं घेऊन बरे होत आहेत. आज देखील आमच्या मंत्रिमंडळातले ७ ते ८ मंत्री आणि दोन्ही बाजूचे काही मान्यवर आमदार करोनाग्रस्त आहेत”. अजित पवार पुढे म्हणाले, “एका गोष्टीचं मला विशेष वाटतं की मुख्यमंत्र्यांना, प्रवीण दरेकरांना आणि सभापती महोदयांना करोना नाही झाला. विधानसभेत मलाही झाला, फडणवीसांनाही झाला. तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुम्हाला झाला नसेल. किंवा त्यांचं (प्रवीण दरेकर) जाकिट बघून तो जवळ गेलाच नसेल, म्हटला असेल कुठं जाकिटातून आत शिरायचं असंही काही झालं असेल तर माहीत नाही”, असं अजितदादा म्हणाले आणि दोन्ही बाजूकडून या कोटीला खळखळून दाद मिळाली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक करणार