Festival Posters

अजित पवारांचा फक्त फुटीर गट

Webdunia
मंगळवार, 4 जुलै 2023 (07:47 IST)
मुंबई : अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का, असा सवाल केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहेत का, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांचा फक्त फुटीर गट आहे. त्यामुळे त्यांना फक्त इतर पक्षात विलीन होता येते, असे आव्हाड म्हणाले.
 
शरद पवार यांना अध्यक्ष मानता. मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर त्यांनी केलेली कारवाई मान्य करणार का, असा सवाल करीत आव्हाड यांनी शरद पवार अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे म्हटले.अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? शरद पवार अध्यक्ष आहेत. मग यांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक कशा, पक्षाची मान्यता नाही त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे, त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
 
त्यांनी वाटलेल्या पदांना संविधानिक मान्यता नाही
सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान विविध पदे वाटली. पण त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. अध्यक्षांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांना कोणालाही नियुक्त करता येत नाही, असे आव्हाड म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

रिक्षाचालकांवर लादलेल्या मराठी भाषेच्या आवश्यकतेवरून वाद, परवाना पडताळणीच्या आदेशामुळे चालक संतप्त

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

पुढील लेख
Show comments