Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते त्यामुळे मी आलो नाही : आदित्य ठाकरे

Webdunia
गुरूवार, 14 डिसेंबर 2023 (21:30 IST)
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूर विधान भवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन झालं. या फोटोसेशनमद्ये आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते. त्यावर आता त्यांचं उत्तर समोर आलं आहे. पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते त्यामुळे मी आलो नाही असं आता आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
 
“आज जे फोटोसेशन झालं त्यात सहभागी होण्याची माझी इच्छा नव्हती, मन नव्हतं. मी आधीच्या फोटोसेशनमध्ये सहभागी होतो. मात्र घटनाबाह्य सरकार जिथे निर्माण झालं आहे आणि पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री बसले आहेत तिथे फोटो काढावा असं वाटलं नाही. मागची रांग की पुढची रांग याने मला काही फरक पडत नाही कारण माझे वडील उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही मी मागच्याच रांगेत उभा होतो. ज्यांनी वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला, ज्यांनी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्याबाहेर घालवला अशा लोकांसह उभं राहून मला फोटो काढायचा नव्हता.” असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीर : किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद

आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात, जपान-कोरिया यांच्यात पहिला सामना

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपवर आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

पुढील लेख
Show comments