राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या सारख्या प्रमुख शहरांबरोबर विदर्भातील शहरांमध्येही दररोजच मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी, “खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी”. अशी मागणी केली आहे.
“ पुण्यातील सीरम तसेच हैदराबादच्या भारत बायोटेक मध्ये करोना लशींचा भरपूर साठा उपलब्ध आहे. असे असताना लशीकरणाचा वेग वाढवायचा असेल तर खासगी रुग्णालयांनाही लसीकरण सुरू करण्यास परवानगी द्यायला हवी. राज्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा.” असं आमदार राजू पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.