suvichar

अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव आजपासून

Webdunia
बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:58 IST)
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव बुधवार, 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळे नोव्हेंबरमध्ये काढल्याने त्यावेळी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला होता. सध्या ढगाळ वातावरण, थंडी आणि धुके असल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
 
श्री अंबाबाईचा दरवर्षी नोव्हेंबर तसेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असा दोनदा किरणोत्सव होतो. गेली काही वर्षे हा किरणोत्सव सोहळा तीन दिवस असायचा. मात्र त्याआधी व नंतरच्या दिवशीही सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर पडायची. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने किरणोत्सव पाच दिवसांचा होत असल्याचे जाहीर केले आहे. पुढील दोन दिवसांत हे वातावरण बदलले, तर देवीचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, असे अभ्यासकांचे मत आहे. या काळात तीन दिवस भाविकांना एक तासासाठी मंदिरात प्रवेश बंदी केली जाणार आहे. भाविकांची सोय व्हावी, यासाठी मंदिरात देवस्थान समिती कार्यालयाशेजारी व नगारखान्याच्या पुढे अशा दोन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून भाविकांना किरणोत्सव लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

समृद्धी एक्सप्रेसवेवर खळबळजनक घटना: बंदुकीच्या धाकावर कार थांबवली, प्रवाशांना लुटले

इशारा! महाराष्ट्रात आजपासून बस, एसटी, टॅक्सी आणि ट्रक संप

LIVE: महाराष्ट्रात आजपासून बस, एसटी, टॅक्सी आणि ट्रकचा संप

National Safety Day2026: राष्ट्रीय सुरक्षा दिनाचा इतिहास, महत्त्व आणि आपली जबाबदारी

LIVE: मुंबईत एटीएस ने गोवंडी-कुर्ला येथून 4 संशयितांना ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments