Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 16 May 2025
webdunia

अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही : चंद्रकांत पाटील

Amit Shah
, बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 (15:56 IST)
शिवसेनेला खरं बोललेलं झोंबतं, अमित शाह हे खरं बोलले ते शिवसेनेला फार झोंबलं. शिवसेनेने प्रतिक्रिया दिली की, आजपर्यंत शिवसेनेला कोणी संपवू शकलेलं नाही, मुख्य म्हणजे अमित शाह यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केलेलीच नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले गिरीश प्रभुणे यांची भेट घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथील गुरुकुलम येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
 
“१४-१५ महिने सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे सरकारचा व्यवहार चालला आहे. तो आम्ही पाच वर्षे आमच्याकडे राज्य असताना केला असता तर शिवसेना संपली असती, हे खरं आहे. आम्ही कधी खुन्नसने वागलो नाही. सरकार सरकार आहे. जुने हिशोब काढून बसण्याचं कारण नाही. शिवसेनेला आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे. त्यानुसार त्यांनी प्रतिक्रिया दिल्या” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
 
“त्यांच्या म्हणण्याला आम्ही काही घाबरत नाहीत. आम्हाला जे म्हणायचं ते छाती ठोक पणे म्हणतो. समोरच्या व्यक्तीला टाकून बोलणं, लागून बोलणं ही आमची, अमित शाह यांची संस्कृती नाही” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांची भेट, चर्चेला उधाण