Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमित पुढे खूप चांगलं काम करणार : कुंदा ठाकरे

Amit will do a lot of good next: Kunda Thackeray
, गुरूवार, 23 जानेवारी 2020 (16:18 IST)
“दुधापेक्षा दुधाची साय घट्ट असते. अमित पुढे खूप चांगलं काम करणार आहे, तो खूप मोठा व्हावा”, अशी आशा अमित ठाकरे यांच्या आजी कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केली. मनसेच्या महाअधिवेशनात नेतेपदी अमित यांची निवड झाली. अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी कुंदा ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरे उपस्थित होते. 
 
“अमित फक्त एक अहवाल वाचेल, अशी माहिती आम्हाला दिली होती. अमित आज पहिल्यांदाच मंचावर जाणार होता. त्यामुळे त्याला ऐकण्याची उत्सुकता होती. मात्र, जेव्हा त्याची नेतेपदी निवड झाल्याची घोषणा झाली तेव्हा मला अत्यंत आनंद झाला. ती गोष्ट आमच्यासाठी जॅकपॉटच ठरली”, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. तर “अमित चांगलं काम करेल, असा विश्वास आहे”, असं मत अमित यांच्या पत्नी मिताली ठाकरेंनी व्यक्त केलं.
 
“मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचे आभार मानते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अमित काम करत होता. पण आता सगळ्यांनी मिळून अमितची नेतेपदी निवड केली. त्याची नेतेपदी निवड होईल याची मला अपेक्षा नव्हती. अमित फक्त एक अहवाल वाचणार असं मला सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही सकाळपासून आलो होतो. पण आज त्याची नेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे”, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता टी-20 विश्वचषक जिंकणे हाच ध्यास