Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सभेत बोलताना ‘या’ आमदारांना अर्धांगवायूचा झटका

amol mitkari
अकोला , सोमवार, 12 जुलै 2021 (17:46 IST)
एका सभेत गाणे गात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. 
 
राष्ट्रवादी सांस्कृतिक आणि चित्रपट आघाडीच्याया विदर्भ संयोजक गायिका वैशाली माडे यांचा अकोला दौरा होता. जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या बिफॉर्म कॉलेजमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केल्यावर शेवटी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावाकड राहिली,माझ्या मनाची होतीया काहीली ही छक्कड खड्या आवाजात गायला सुरुवात केल्यावर काही क्षणात त्यांचा आवाज चिरका व्हायला लागला,तोंड किंचित वाकडे होत असल्याची जाणीव उपस्थित काहींना होताच तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
प्रकृती स्थिर भेटायला येऊ नका
दरम्यान अमोल मिटकरी यांच्या प्रकृतीत सुधारणा असून चिंता करण्यासारखे काही नसल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले आहे,स्वतःचा जीव धोक्यात घालून मला भेटायला येवू नये अशी विनंती अमोल मिटकरी यांनी कार्यकर्ते व मित्रांना केली आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेस्सी कोपा अमेरिका जिंकल्यानंतर अर्जेटिनामध्ये दाखल झाला मेसी, पत्नीने विमानतळावर KISS केले (व्हिडिओ)