Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अमरावतीकरांना संचार बंदीतून दिलासा, रात्रीची संचारबंदी कायम

अमरावतीकरांना संचार बंदीतून दिलासा, रात्रीची संचारबंदी कायम
, मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (10:27 IST)
त्रिपुरात झालेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटल्याने अमरावतीतील परिस्थिती तणावपूर्ण निर्माण झालेली आहे .राज्यात नांदेड, मालेगाव, अमरावतीत मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अमरावतीत काही आंदोलकांनी दगडफेक केली, दुकानांची  तोडफोड करण्यात आली . पोलिसांना त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचा फटका व्यापारी वर्गाला बसला असून आता अमरावतीकरांना या संचारबंदी पासून मोठा दिलासा मिळणार आहे  आज सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत बाजारपेठ उघडे असणार .मात्र रात्रीची संचारबंदी सुरूच असणार. पोलीस आयुक्त डॉ.  आरती सिंग यांनी  दिलेल्या आदेशानुसार, सकाळी 7 वाजे पासून ते रात्री 9 वाजे पर्यंत सर्व  बाजार सुरु राहणार तर रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत संचार  बंदी लागू असणार. सोशल मीडियावर  कोणतेही आक्षेपार्ह मेसेज प्रसारित करू नये असेही आवाहन देण्यात आले आहे. असं केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी आता पर्यंत 55 गुन्हा दाखल केले आहे तर अमरावती हिंसाचारानंतर या प्रकरणात 312 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नाही, मग त्यांच्याकडे बैठक का?' - गोपीचंद पडळकर