Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 17 May 2025
webdunia

नागपुरात आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

IT company employee  died of a heart attack
, रविवार, 29 सप्टेंबर 2024 (15:47 IST)
नागपुरातील एका आयटी कंपनीत कर्मचाऱ्याचा कंपनीच्या स्वछतागृहात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 40 वर्षीय हा कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी 7  वाजेच्या सुमारास कंपनीच्या टॉयलेट मध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन एडविन मायकल असे या मयत चे नाव आहे. 
 
पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून शव विच्छेदनासाठी पाठवले आहे.  शवविच्छेदन अहवालात हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायकल हा नागपुरातील एका आयटी कंपनीत कामाला होता. शुक्रवारी तो कंपनीच्या बाथरूम मध्ये गेला असता हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला.
मयत मायकलच्या पश्चात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या (UBT) उमेदवारांची यादी नवरात्रीत जाहीर करणार -अंबादास दानवे