Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ

Anil Deshmukh's ED remand extended till November 15अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत 15 नोव्हेंबरपर्यंत वाढ Maharashtra  News  Regional Marathi News  In Webdunia Marathi
, शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (15:01 IST)
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी कोठडी तीन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीतच असतील.
 
माझ्याकडे सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे ईडी कोठडी पुन्हा वाढवून देऊ नका, अशी विनंती अनिल देशमुख यांनी कोर्टाकडे केली होती. पण ईडीने जबाब नोंद करायचं कारण देत तीन दिवस ईडी कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. ईडीची ही मागणी मान्य करून अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
 
याआधी मुंबई हायकोर्टाने 12 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यावेळी मुंबई हायकोर्टाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत अनिल देशमुखांची ईडी कोठडी कायम केली होती. यापूर्वी विशेष न्यायालयाने ईडी कोठडीची मागणी फेटाळली होती.
 
यानंतर अनिल देशमुखांची रवानगी मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. परंतु आता मुंबई हायकोर्टाने हा आदेश रद्द करत अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ केली आहे.
या सुनावणीदरम्यान पत्रकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला नव्हता. सुनावणी आधीच न्यायालयानं पत्रकारांनी मुख्य प्रवेशाच्या बाहेरच थांबावे असे निर्देश दिले होते.
 
1 नोव्हेंबरला झाली होती अटक
1 नोव्हेंबरला सकाळी देशमुख अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
 
PMLA कायद्याच्या सेक्शन 19 अंतर्गत त्यांच्यावर अटकेची तारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज ( मंगळवार) मुंबईच्या सेशन्स न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी असल्याने हॅालिडे कोर्टात त्यांना हजर केलं जाईल. या प्रकरणी अनिल देशमुख याचे दोन स्वीय सहाय्यक संजय पालांडे आणि कुंदन शिंदे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
 
जुलैमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडी कोठडी मागताना ईडीनं 14 दावे केले होते.
 
अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार.
पालांडे यांनी जबाबात सांगितलंय की IPS अधिकाऱ्यांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता.
सगळा व्यवहार रोखीने व्हायचा.
संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मध्यस्थ आहेत.
पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते.
चौकशीत अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा थेट सहभाग असलेल्या 11 आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 13 कंपन्यांची भूमिका.
चौकशीत उघड झालंय की अनिल देशमुख यांच्या अप्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यातून त्यांच्या प्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यात पैशांचा व्यवहार होत होता.
हा मनी लॅांडरिंगचा प्रकार आहे,
सचिन वाझे यांच्या जबाबानुसार त्यांना अनिल देसमुख यांच्याकडून काही प्रकरणात थेट आदेश मिळत होते.
वाझे जबाबात सांगतात त्यांनी अनिल देशमुख यांच्या आदेशावरून 4.70 कोटी रूपये कुंदन शिंदे यांना दिले.
अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत 4.18 कोटी रूपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाऱ्या दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत.
हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले.
अनिल देशमुख यांना बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये लाच म्हणून मिळाले.
मुलगा ऋषीकेष देशमुख याच्या माध्यमातून दिल्लीच्या कंपन्यांना पैसे देऊन हा पैसा साई शिक्षण संस्थेत फिरवण्यात आला.
अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम
21 मार्च - रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं.
 
5 एप्रिल - अनिल देशमुख यांचा राजीनामा.
 
10 मे - ईडीने मनी लॅाडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला.
 
26 जून - अनिल देशमुख यांना पहिलं समन्स.
 
29 जून - दुसरं समन्स.
 
5 जुलै - तिसरं समन्स पाठवण्यात आलं.
 
16 जुलै - चौकशीसाठी चौथं समन्स देण्यात आलं.
 
17 ऑगस्ट - अनिल देशमुख यांना पाचवं समन्स.
 
2 सप्टेंबर- देशमुख यांनी बॅाम्बे हायकोर्टात समन्स रद्द करण्याची याचिका केली.
 
29 ऑक्टोबर - अनिल देशमुख यांची समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.
 
1 नोव्हेंबर - अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर.
 
2 नोव्हेंबर - अनिल देशमुख यांना अटक.
 
मी ED समोर हजर झालो, आरोप करणारे परमबीर सिंग कुठेत - अनिल देशमुख
गेल्या काही दिवसांपासून देशमुख अज्ञातवासात होते. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले होते.
 
अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते ,असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. अनिल देशमुख यांनी मात्र परमबीर सिंगांचे आरोप फेटाळून लावले होते.
 
अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत त्यांनी म्हटलंय की, "मला ईडीचं समन्स आलं, तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशापद्धतीच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमांमध्ये आल्या. मला ज्या ज्या वेळी समन्स बजावण्यात आलं, त्या त्या वेळी मी सांगितलं की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी चालू आहे.
 
"मी सुप्रीम कोर्टातसुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये येईल. ते पुढे म्हणाले, "माझी केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे. पण, आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालो आहे. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले, तेच देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत.
 
"परमबीर सिंग यांच्या आदेशानुसार, सचिन वाझेनं माझ्यावर आरोप केला. तो स्वत: आज तुरुंगात आहे. या अशा लोकांच्या आरोपांमुळे माझी चौकशी करत आहे, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्याचा मला त्रास होत आहे." ते पुढे म्हणाले, "माझी केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे. पण, आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालो आहे. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले, तेच देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत.
 
"परमबीर सिंग यांच्या आदेशानुसार, सचिन वाझेनं माझ्यावर आरोप केला. तो स्वत: आज तुरुंगात आहे. या अशा लोकांच्या आरोपांमुळे माझी चौकशी करत आहे, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्याचा मला त्रास होत आहे."
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक! पत्नी बोलत नसल्याने पतीने रागाच्या भरात येऊन पत्नीचा खून केला