Marathi Biodata Maker

अनेक पक्ष, गट यामुळे देशाच्या विकासाला खीळ - अण्णा हजारे

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:42 IST)
राजकीय पक्ष, गट यामुळे  खेड्यांचा विकास थांबला आहे. पर्यायाने देशाच्या विकासाला खीळ बसली असल्याचे 
प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. राळेगणसिद्धी येथे पार पडलेल्या सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या कार्यक्रमप्रसंगी हजारे बोलत होते. या वेळी महासंघाचे अध्यक्ष नामदेव घुले, सरचिटणीस अशोक सब्बन, सहचिटणीस दत्ता आवारी, उपाध्यक्ष कैलास पटारे, उपाध्यक्ष रोहिणी गाजरे, संघटक प्रवीण साठे, खजिनदार डॉ. प्रशांत शिंदे, राजाराम गाजरे व विविध जिल्ह्यांतील उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अण्णा हजारे म्हणाले, गावातील एक गट चांगला काम करत असेल, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. कारण पक्ष आणि पार्टीमुळे गावातील लोक दोन गटांत विभागले गेलेले आहेत.गावातील लोकांनी घटनेच्या कलम ८४ ‘ख’ व ‘ग’ नुसार पक्ष-पार्टीविरहित निवडणूक लढवण्याचे आवाहन हजारे यांनी केले. असे झाले तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल.यावेळी लोकशाही मजबूत करणे गरजेचे असून देशाचा विकास हेच सर्वांचे ध्येय असले पाहिजे असे हजारे म्हणाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

पर्यटक व्हिसावर धार्मिक प्रचार केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी तीन अमेरिकी नागरिकांना 'भारत सोडा' नोटीस बजावली

'माझी लडकी बहिण योजने'साठी ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल; फक्त दोन दिवस शिल्लक राहिले

LIVE: नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याकडून १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

मोबाईलचे व्यसन ठरले जीवघेणे: नाशिकमध्ये जन्मदात्या पित्याकडून १४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या

पुण्याच्या गंगानगर परिसरात तडीपार गुंड राणा कांबळे याची वर्चस्वाच्या वादातून कोयत्याने वार करून हत्या

पुढील लेख
Show comments