suvichar
✕

रस्त्यावर टाकलेल्या कचवरून रिक्षा घसरली अन् एकाचा मृत्यू झाला

Webdunia
बुधवार, 2 मार्च 2022 (07:14 IST)
रस्त्यावर टाकलेल्या कचवर रिक्षाचे चाक घसरून झालेल्या अपघातात रिक्षा चालक प्रशांत पोपट कांबळे (वय 36 रा. आरणगाव ता. नगर) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. नगर-दौंड रस्त्यावर आरणगाव शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रस्त्यावर कच टाकणारा दत्ताय शांतराम देवगावकर (रा. आरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत कांबळे यांची पत्नी छाया प्रशांत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
रात्रीच्या वेळी प्रशांत कांबळे हे त्यांच्याकडील रिक्षा घेऊन नगर-दौंड रस्त्याने जात होते. दत्तात्रय देवगावकर याने त्याच्या बंगल्याच्या कामासाठी कच आणलेली होती.ती कच त्याने रस्त्यावर टाकली आहे. या कचवरून रिक्षाचे एक चाक गेल्याने रिक्षा रस्त्याच्या डिव्हायडरला जावून धडकुन पलटी झाली.
यामुळे प्रशांत यांच्या डोक्याला मार लागून ते मयत झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक एस. बी. बडे करीत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

नवीन

पॅन कार्ड आणि आधार लिंक नसले तर या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो?

IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा टी२० आंतरराष्ट्रीय सामना आज खेळला जाणार

माजी दिग्गज खेळाडू युवराज सिंगची दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहार तुरुंगात रवानगी

LIVE: महाराष्ट्र राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये 'ट्रिगर-१' लागू

पुढील लेख
Show comments