Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लष्कराचे ऑपरेशन वर्षा;पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थानी हलविले

Webdunia
रविवार, 25 जुलै 2021 (15:30 IST)
भारतीय लष्कर महाराष्ट्रात पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सज्ज झाले असून त्यात अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.पूरग्रस्त भाग सांगली,कोल्हापूर,रत्नागिरी आणि इतर ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
 
अतिवृष्टी आणि विविध नद्यांची पातळी वाढल्यामुळे रत्नागिरी,कोल्हापूर,सांगली व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली आले.नागरी प्रशासनाच्या विनंतीवरून दक्षिणेकडील कमांडने पूरग्रस्त भागातील स्थानिकांना मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथक तैनात केले आहेत. 
 
24 जुलै 2021 रोजी औंध लष्करी तळ आणि बॉम्बे अभियांत्रिकी समूह, पुणे येथील एकूण 15 बचाव आणि मदत दल सांगली,पलूस, बुर्ली आणि चिपळूण येथे पूर मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. 
 
ही पथके पुराच्या भागात अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या बचावासाठी आणि या पूरग्रस्त भागात सामान्य स्थिती येई पर्यन्त मदत करण्यात गुंतलेले आहेत.पूरग्रस्त भागातून 100 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
 
भारतीय सैन्य देखील गावकऱ्यांना टँकरमधून अन्न आणि पिण्याचे पाणी पुरवित आहे. वैद्यकीय शिबिरे देखील स्थापन केली गेली आहेत ज्यात पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक ते प्राथमिक उपचार आणि औषधे पुरविण्यासाठी सैन्य डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कराने आपल्या तैनात केलेल्या अभियांत्रिकी प्रयत्नांनी रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे बुद्रुक गावात मुख्य दरड कोसळल्यामुळे बंद पडलेला रस्ता खुला केला आहे.
 
 सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराने पुणे स्थित मुख्यालय दक्षिणी कमांड येथे फ्लड रिलीफ ऑपरेशन वॉर रूमची स्थापना केली आहे. अतिरिक्त 10 मदत पथक कोणत्याही आपत्कालीन परिस्थितिसाठी सतर्क ठेवण्यात आले आहे
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

ठाणे : पावसाळ्यापूर्वी होर्डिंग्ज हटवण्याचे आणि नाले साफ करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

LIVE: पालघरमध्ये पोलिसांनी मेफेड्रोन जप्त करीत नायजेरियन महिलेला केली अटक

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या खासगी सहाय्यकाला आयकर अधिकारी असल्याचे भासवून मागितली १ कोटी रुपयांची लाच

अ‍ॅसिडिटी आहे असे समजून महिनाभर गोळ्या घेतल्या, मुंबईतील महिलेच्या पोटात फुटबॉलपेक्षा मोठी गाठ आढळली

'बाळासाहेबांच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहिले असते तर आज...',उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव गटावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments