Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

Arrest warrant issued against Raj Thackerayराज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी  Marathi Regional News  In Webdunia Marathi
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:20 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने हे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी २००८ मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 
या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. राज ठाकरे यांचे नवे निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर चार कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी पुढील १० दिवसांमध्ये नियोजित असलेले सर्व कार्यक्रमही रद्द केले आहेत. दरम्यानच, परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांना वॉरंट निघाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांच्या वर