अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला पॅरोल मंजूर झाला आहे. गवळी 30 एप्रिलला मुंबईत येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली.
अरुण गवळीने संचित रजेसाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना नागपूर खंडपीठाने गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.