Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

अमित शहा परतताच मध्यरात्री शिंदे आणि फडणवीसांची गुप्त बैठक;काय झाली चर्चा?

shinde fadnais
, बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (14:51 IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईहून दिल्लीकडे जाताच मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खलबतं झाली आहेत. रात्रीच्या सुमारास या दोन्ही नेत्यांची तब्बल ३ तास बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा आणि निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीचा मुख्य अजेंडा मुंबईसह राज्यातील आगामी महापालिका निवडणुका हा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुंबई दौरा केला. यावेळी त्यांनी मिशन मुंबई १५० चे लक्ष्य भाजपला दिले आहे.  मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी युद्ध पातळीवर कामाला लागण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबत घेत कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर भाजपची सत्ता स्थापन करायचीच असा चंग बांधण्यात आला आहे. त्यासाठीच आता गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
 
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तब्बल ३ तास चर्चा झाली. रात्री उशिरा ही बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या मुंबई महापालिकेच्या मिशन १५० च्या अनुषंगाने ही बैठक झाली असावी, असा अंदाज वर्तवला जातो असून या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गट यांच्यात समन्वय कसा साधता जातो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
 
मुंबई मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेमकी काय चर्चा झाली, यावरुन आता तर्कवितर्कांना उधाण आले असून शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपने शिवसेनेच्या ताब्यातील महापालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये मुंबई मनपावर भाजपची सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मागील 2017 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतली होती. शिवसेना व भाजपमध्ये अवघ्या काही जागांचा फरक होता. शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्यानंतर मुंबई महापालिका निवडणूक सोपी करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीत अमित शाह हे मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्याची शक्यता आहे. शिंदे गट व भाजप ही निवडणूक एकत्रपणे लढवणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार की राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झाले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rape of a minor girlअल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना