Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या तारखेला अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार

Ashok Chavan will join BJP
, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 (09:39 IST)
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय भूकंप झाल्याचं चित्र आहे. अशोक चव्हाण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह हे 15 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यावेळी अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.  अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली. तसेच भोकर विधानसभेच्या आमदारकीचाही त्यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवल्याचं सांगितलं.
 
केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता
राज्यात मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेश केल्यानंतर केंद्रात मोठं पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार असल्याची चर्चाही आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट