rashifal-2026

आरक्षण घटने प्रमाणेच द्या - अशोक चव्हाण

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (10:04 IST)

भारतीय राज्य घटनेने सूचित केल्याप्रमाणे सगळी आरक्षणं अबाधित राहिली पाहिजेत. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हे शरद पवार यांचं मत वैयक्तिक आहे असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले. कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवराज पाटील चाकूरकर, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, आ. दिलीपराव देशमुख, तु आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबक भिसे, आ. बसवराज पाटील मुरुमकर, ललितभाई शहा,  उपस्थित होते. 

निवडणुका जवळ आल्यानं सगळ्यांनीच तयारी सुरु केल्यानं राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीचा विषय निघालाच. राष्ट्रवादीशी आघाडी करावी की करु नये याबद्दल कार्यकर्त्यांचं मत काय आहे असा प्रश्न विचारला असता, वेगवेगळ्या ठिकाणची मते वेगवेगळी आहेत, काही ठिकाणी करा म्हणतात, काही ठिकाणी नको म्हणतात. शिबिरांच्या माध्यमातून आम्ही सर्वांची मते जाणून घेत आहोत, अद्याप यावर अजून काही नक्की झाले नाही. काही राज्यात भाजपला सत्ता मिळाली असं होत राहतं. राज्यात मोठ्या प्रमाणावर शाळा बंद केल्या जात आहेत, शालेय शिक्षणाबाबतचा त्यांचा विचार सकारात्मक दिसत नाही. इकडे शाळा बंद अन तिकडे मोठ्या प्रमाणावर दारुची दुकाने उघडली जात आहेत. शासनाची प्राथमिकता कशाला आहे? शाळा बंद करणे आणि दारुची दुकाने उघडणे असा प्रकार चालू आहे.  नुसत्याच घोषणा केल्या जातात असेही चव्हाण म्हणाले.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

सोलापूरमध्ये दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला

पीव्ही सिंधू स्विस ओपन स्पर्धेत सहभागी होणार नाही, ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधून माघार घेतली

सिलिंडरची साठवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल, ESMA कायदा लागू

LIVE: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार

बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले सुरूच, दोघांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments