Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपूर हादरलं; कुटुंबातील 5 जणांची हत्या करून मारेकरीची आत्महत्या

assassin commits suicide by killing 5 members of family in nagpur
, सोमवार, 21 जून 2021 (15:42 IST)
नागपुरात एका धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आल्याची बातमी आहे. आपल्याच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्यानंतर कुटुंबप्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अलोक माटूळकर याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. 
 
नागपुरच्या पाचपावली भागात हा हादरणारा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा घरी येऊन गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलं. 
 
सूत्रांप्रमाणे महुणीशी वाद असल्यामुळे हा प्रकार घडला आणि रागाच्या भरात संपूर्ण कुंटुब संपलं. रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. 
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
 
कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज  पोलिसांनी वर्तवला आहे. पुढील तपास सुरु आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bank Privatisation: आता सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि ओव्हरसीज बँकदेखील निर्गुंतवणूक होईल