Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हजर व्हा, चांदिवाल आयोगाचे नवाब मलिकांना समन्स

Webdunia
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (07:59 IST)
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल आयोगाने महाविकास आघाडी सरकारचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना समन्स जारी केले आहे. त्यांना येत्या गुरुवारी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचे गंभीर आरोप केले. उच्च न्यायालयानेही या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तर राज्य सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, वाझेकडून बाजू मांडण्यात आली. मलिक यांच्याकडून अँटिलिया स्फोटकं परमबीर आणि आपला हात असल्याचा आरोप कऱण्यात आला होता. मात्र, ते आरोप चुकीचे असून त्यामुळे आपली प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगत वाझेकडून आयोगासमोर मलिक यांनी केलेल्या वक्तव्यांची वृत्तपत्रांची कात्रणे दाखविण्यात आली. त्याची दखल घेत आय़ोगाने मलिक यांना समन्स बजावत १७ फेब्रुवारी रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

Breaking News :मौलाना खलील उर रहमान सज्जाद नोमानी यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर

अजित पवारांना पीएम मोदींची 'एक है तो सेफ है' ही घोषणा आवडली,'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला विरोध

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

येमेनच्या हुथी बंडखोरांचा अमेरिकन युद्धनौकांवर ड्रोन-क्षेपणास्त्रांनी हल्ला

Maharashtra Elections 2024: मोदी सरकार वक्फ कायद्यात सुधारणा करणार, अमित शहांची घोषणा

पुढील लेख
Show comments