Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काकुने यकृत दान करत पुतण्याचा वाचवला जीव

liver
, शनिवार, 24 जून 2023 (21:20 IST)
नाशिक : 
नाशिकमधील बागलाण तालुक्यातील आनंदपूरमध्ये काकूने आपल्या स्वतःच्या जीवावर उदार होत वयाचा, पती व मुलांचा विचार न करता मृत्यूशय्येवर असलेल्या आपल्या पुतण्याचा यकृत दान करत जीव वाचवला. माझाही एकच मुलगा आहे व माझ्या जाऊचाही एकुलता एक मुलगा आहे म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे त्याया सांगतात. 
 
अधिक माहिती अशी की, बागलाण तालुक्यातील आनंदपूर येथील डॉ अरुण आत्माराम अहिरे यांची नामपूर येथे पथोलॉजी लॅब आहे. तर डॉ अरुण यांचे कुटुंब तालुक्यातील आनंदपूर याठिकाणी वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांना कावीळ सदृश्य लक्षणं जाणवू लागली. अनेक ठिकाणी उपचार केले परंतु यश आले नाही. यानंतर काही दिवसांनी हा त्रास वाढत गेला. यानंतर यकृत निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
दिवसागणिक हा त्रास वाढत गेला. यानंतर यकृत दान करून ते प्रत्यारोपण करावे लागेल असेही डॉक्टरांनी सांगितले. यकृत दान करणारी व्यक्ती कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील असावी असेही डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रथमत: आईने यकृत देण्यासाठी तयारी दर्शिवली. यकृत दान करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया सुरु झाल्या.
 
मात्र, यकृतात अधिक चरबी असल्यामुळे हे यकृत प्रत्यारोपण करता येणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, आता काय करावे असा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा होता. यानंतर डॉ अरुण यांची काकू वंदना अर्जुन अहिरे या यकृत दान करण्यासाठी तयार झाल्या. त्यांनी सांगितले की, तुमचा मुलगा आणि माझा मुलगा एकच. माझ्या यकृताची तपासणी करावी मी हे यकृत दान करण्यासाठी तयार असून माझा मुलगा वाचला पाहिजे एव्हढंच. यानंतर मावशीच्या यकृताची तपासणी केली. हे यकृत दान करता येईल असे डॉक्टरांनी जेव्हा सांगितले तेव्हा कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला.
 
मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल या एकाच दवाखान्यात काकू आणि पुतण्याला दाखल करण्यात आले. काही दिवस ऍडमिट ठेवल्यानंतर काकूचे यकृत काढण्यात आले. यानंतर काही वेळेतच पुतण्यावर यकृत प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरु झाली. यानंतर दोघांवर यशस्वी उपचार करण्यात आले. नुकतेच मावशीला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती चांगली आहे. लवकरच डॉ अरुण यांनादेखील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असून त्यांना योग्य ती काळजी पुढील काही दिवस घ्यावी लागणार असून नंतर ते सर्वसामान्य जीवन जगू शकतील असा विश्वास ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमीत मंडोत यांनी व्यक्त केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सामाजिक एकता : बकरी ईद असूनही ‘कुर्बानी ’ देण्याचा देणार नाही