Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Aurangabad :गरम पाण्याच्या बादलीत पडून 4 वर्षांच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू

4-year-old girl tragically died
, रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (16:31 IST)
अंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी हिटर लावून ठेवलेल्या बादलीत पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना औरंगाबाद येथे घडली आहे. श्रेया राजेश शिंदे असे या चिमुकलीचे नाव आहे. श्रेया ही औरंगाबादच्या कमळापूरच्या साईनगर येथे आपल्या आई वडिलांसह राहत होती. राजेश शिंदे हे आपल्या पत्नी सात वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाच्या श्रेयासह कमळापूरच्या साईनगर येथे राहतात.

राजेश बुधवारी दुपारी कामावरून घरी आल्यावर त्यांनी अंघोळीसाठी बादलीत गरम पाण्याचे हिटर लावले होते. बाथरूममध्ये हात धुताना श्रेयाचा तोल गेला आणि ती गरम पाण्याच्या बादलीत पडली. श्रेयाने आरडाओरड केल्याने राजेश आणि त्यांच्या पत्नीने बाथरूममध्ये धाव घेतल्यावर ती बादलीत पडलेली दिसली. राजेशने तातडीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना शॉक लागला त्यांनी तातडीने हिटरचे बटन बंद केले आणि श्रेयाला रुग्णालयात नेले. गरम पाण्याच्या बादलीत पडल्यामुळे श्रेया गंभीररित्या भाजली होती. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु असता तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे. श्रेयाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA World Cup: ब्राझीलला मोठा धक्का, स्टार खेळाडू नेमार पुढील सामन्यातून बाहेर