Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईहून पहिली आस्था ते अयोध्या ट्रेन ‘या’ तारखेपासून धावणार

Webdunia
रविवार, 28 जानेवारी 2024 (10:34 IST)
अयोध्या येथील मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी भारतीय रेल्वे देशातील विविध भागातून रामभक्तांसाठी ‘आस्था स्पेशल’ ट्रेन चालविणार आहे. यामध्ये मुंबईतून १६ गाड्या अयोध्याच्या दिशेने धावणार आहेत.
 
मध्य रेल्वेच्या पाचही विभागांतून एकूण ४६ आस्था ते अयोध्या विशेष प्रीपेड ट्रेन चालवणार आहे. यापैकी ३० (१५ अप आणि १५ डाऊन) गाड्या मुंबई सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत धावतील. पहिली आस्था ते अयोध्या स्पेशल ट्रेन २९ जानेवारी २०२४ रोजी सीएसएमटी येथून सुटेल. आस्था से अयोध्या विशेष ट्रेनच्या पूर्ण खर्च भाजप, आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद उचलणार आहे. ही ट्रेन मध्य रेल्वे चालवणार आहे तर प्रवाशांसाठी खानपानाची व्यवस्था आयआरसीटीसीकडून करण्यात येणार आहे.
 
मुंबईहून १६ स्पेशल गाड्या –
सीएसएमटी ते अयोध्येपर्यंत एकूण १६ आस्था ते अयोध्या स्पेशल रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रात्री १०. ३५ वाजता सुटेल आणि सुमारे ३४ तास ५५ मिनिटे प्रवास केल्यानंतर सकाळी ९.३० वाजता अयोध्या स्थानकावर पोहोचेल. या परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन अयोध्येहून दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि १२. ४० वाजता मुंबईला पोहोचेल.
 
नाश्ता जळगावात, दुपारचे जेवण भोपाळमध्ये –
मुंबई ते अयोध्या दरम्यानच्या प्रवासादरम्यान राम भक्तांना जळगावमध्ये नाश्ता, खंडवामध्ये दुपारचे जेवण, भोपाळमध्ये रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशी कानपूरमध्ये नाश्ता देण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान आयआरसीटीसी शुद्ध शाकाहारी जेवण आणि नाश्ता देईल.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे काय?

तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?

सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या

Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ठेवा, सकारात्मक निकाल मिळेल!

सर्व पहा

नवीन

LIVE: लातूरमध्ये पोलिसांनी ५ कुख्यात गुन्हेगारांना अटक केली

लातूरमध्ये पोलिसांनी ५ कुख्यात गुन्हेगारांना अटक केली; घरांमध्ये दरोडे घालत असत

सरकारने ३५ अत्यावश्यक औषधांच्या किमती कमी केल्या, जनतेला मोठा दिलासा, मंत्रालयाचा आदेश काय आहे ते जाणून घ्या?

राजकीय मतभेद विसरून शरद पवार आणि अजित पवार एका समारंभात एकत्र दिसले, दोन वर्षांनी हा योगायोग कसा घडला?

2 रुपये फी घेणाऱ्या डॉक्टरांचे निधन

पुढील लेख
Show comments