Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेब ठाकरेंचे नातू शिंदे गटात; निहार ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2022 (21:27 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा झटका देत एकनाथ शिंदे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. उद्धव ठाकरे यांचे पुतणे आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला आहे. निहार हे ठाकरे कुटुंबातून आलेले आहेत आणि शिवसेनेचे उत्तराधिकारी देखील आहेत.
 
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवे संकट निर्माण करत आहे. पहिले एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आपल्या बाजूने घेतले आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. आता ठाकरे कुटुंबातच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांनी शुक्रवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. एकनाथ शिंदे यांनी निहारसोबतच्या भेटीत राजकारणातही उतरावे, असे म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आहे. त्यावर निहार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
 
निहार ठाकरे यांच्या वडिलांचे नाव बिंदुमाधव ठाकरे होते, त्यांचा 1996 मध्ये रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. बिंदूमाधव हे बाळासाहेब ठाकरेंच्या तीन मुलांपैकी जेष्ठ होते. उध्दव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे इतर दोन आहेत. राजकीयदृष्ट्या निहार ठाकरे यांचे वडील बिंदुमाधव राजकारणात सक्रिय नव्हते. ते चित्रपट निर्माते राहिले आहेत. आता एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षात घेण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीचा प्रचार जातीयवादी आणि द्वेषपूर्ण, काँग्रेसचा भाजपचा आरोप

काँग्रेसने आजपर्यंत राज्यांमध्ये एकही आश्वासन पूर्ण केले नाही-प्रकाश जावडेकर

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

पुढील लेख
Show comments