गडचिरोली :गुप्तांगासाठी जीवंत विद्युत तारेच्या साह्याने अस्वलाची शिकार केल्याची धक्कादायक घटना सिरोंचा वन विभागातील आरडा परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणात सिरोंचा वनविभागाच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अस्वलाची २० नखे जप्त करण्यात आली आहे . मधुकर मलय्या दुर्गम (रा. पेंटीपाका), महेंद्र चंद्रय्या कुम्मरी, राजबापू पेदासमय्या दुर्ग व समय्या मलय्या दुर्गम (सर्व रा.लक्ष्मीपूर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२७ ऑक्टोबर रोजी सिरोंचा वनपरिक्षेत्रातील आरडा नियत क्षेत्रात अस्वल मृतावस्थेत आढळून आले होते. एकंदरीत घटनास्थळावरील स्थितीवरून अस्वलाची शिकार केल्याचे स्पष्ट होत होते. याप्रकरणातील संशयित आरोपींच्या शोधार्थ सिरोंचा वनपरिक्षेत्राधिकारी पी. एम. पाझारे यांच्या मार्गदर्शनात पथक रवाना झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. आरोपींनी अस्वलाच्या चारही पायाचे पंजे तसेच गुप्तांग कापून नेले होते
Edited by : Ratnadeep Ranshoor