Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, महिला दरीत कोसळली

honey bee attack
, रविवार, 24 एप्रिल 2022 (13:51 IST)
राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचे मोहोळ मागे लागल्याने किल्ल्यावर गेलेल्या पर्यटकांची चांगलीच धांदल उडाली आणि त्यांची पळापळ झाली. या धावपळीत एक 29 वर्षीय महिला 200 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने तिचा जीव वाचला ती जखमी झाली असून तिला स्थिकांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहे. रोहिणी सागर वराट असे या महिलेचे नाव असून ही महिला पिंपरी चिंचवडच्या वाकड भागातील रहिवासी आहे. ही महिला चार जणांच्या गटासह राजगड किल्यावर पर्यटनासाठी आलेली होती. दरम्यान मधमाश्यांच्या मोहोळ पर्यटकांच्या मागे लागला आणि त्यांनी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्या मुळे पर्यटक इकडे तिकडे धावले आणि त्या धावपळीत रोहिणी या 200 फूट खोल दरीत कोसळल्या.
 
या पूर्वी देखील उन्हाळी शिविरात आलेल्या 200 जणांवर या मधमाश्यांनी हल्ला केला होता या शिविरात सुमारे 151 विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता. या हल्ल्यात विद्र्यार्थ्याना वाचवताना 7 जण गंभीर जखमी झाले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Archery World Cup: भारताच्या कंपाऊंड पुरुष तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले