Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाप्परे, विधानभवनाच्या आवारात बिअरच्या बाटल्या

Beer bottles
, शुक्रवार, 6 जुलै 2018 (15:29 IST)
नागपूरमध्ये विधानभवन आवारात बिअरच्या बाटल्या सापडल्या आहेत. विधानभवन परिसरातून पाण्यात निचरा करणाऱ्या गटारांमध्ये या बिअरच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे बिअरच्या बाटल्यामुळेच पाणी तुंबल्याचं आता बोललं जातं आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरच या बाटल्या गटारीतून बाहेर काढण्यात आल्या आहेत. 
 
दुसरीकडे महाराष्ट्र विधीमंडळाच्या इतिहास बहुदा प्रथमच पावसामुळे संपूर्ण दिवसाचं कामकाज तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी पक्षावर आली आहे. मुसळधार पावसानं विधीमंडळातला वीज पुरवठाच खंडीत झाल्यानं दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलंय. पावसामुळे विधीमंडळ परिसरात गुडघ्याभर पाणी साचलं. शिवाय दोन्ही सभागृहात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरला मुसळधार पावसाचा फटका