Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईबाबांच्या दर्शनाला जाण्यांपूर्वी जाणून घ्या दर्शनाची वेळ

Webdunia
सोमवार, 29 मार्च 2021 (09:22 IST)
भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने एक महत्वपूर्ण माहिती  देण्यात आली आहे. यात  भाविकांना साईंचे दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्री ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे.तसेच श्री साईप्रसादालय हे सकाळी १० ते रात्री ७.३० यावेळेत सुरु राहील याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी.असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
 
त्यांअनुषंगाने श्री साईबाबा मंदिरात गर्दी होवु नये म्हणुन संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
 
त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी ७.१५ ते रात्रौ ७.४५ यावेळेत खुले राहणार आहे.दरम्यान भाविकांनी कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करुन साईबाबा संस्थानला सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

माझ्या तीन पिढ्यांनी कधीही शेतीचे वीज बिल भरले नाही, शिंदे गटाच्या खासदारांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर नाट्य सादरीकरण होणार, लवकरच येणार!

पुढील लेख
Show comments