Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भंडारा भीषण अपघातात 8 ठार 13 जखमी

Webdunia
मंगळवार, 1 मे 2018 (08:56 IST)
जिल्ह्यातील लाखनी तालुक्‍यात राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या नागपूरच्या वऱ्हाड्यांना कंटेनरने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री 8च्या सुमारास घडली. या अपघातात सुमारे 8 ठार तर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. संतप्त नागरिकांनी रास्तारोको करत संताप व्यक्त केला आहे. यामुळे ताण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6वरील लाखनी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन आहे. सोमवारी सायंकाळी येथील विवाह सोहळ्यासाठी नागपूरचे हरगुडे कुटुंबातील वऱ्हाडी आले होते. लग्न लागल्यानंतर वऱ्हाडी महामार्गाच्या कडेला उभे होते. याच दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर घेऊन जाणाऱ्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. नवरदेवाच्या गाडीला धडक देत वऱ्हाड्यांना चिरडले. मृतकांमध्ये हिंगणघाट येथील एक दाम्पत्य आणि दहा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती ढासळल्याने नंतर त्यांना भंडारा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याच्या वेळापत्रकात मोठा बदल केला; महिला संघ तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळणार

१९ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे ठाकतील, हॉकी विश्वचषक संघ जाहीर

CJP मध्ये बंडखोरीची ठिणगी! कोर कमिटीत भाई-भतीजावाद; अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन

LIVE: सीजेपीमध्ये बंड! कोअर कमिटीमध्ये घराणेशाहीचा आरोप करत कार्यकर्त्यांचे अभिजीत दीपके यांच्या घराबाहेर आंदोलन

उद्घाटनानंतर अवघ्या २२ दिवसांत रस्ता खचला, वाळवण्यासाठी लाव पंखा! अखिलेश यादवांचा भाजपवर जोरदार टोला

पुढील लेख
Show comments