बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी जाहीर झाली. यामध्ये नैसर्गिक संकटांची सरबत्ती, पाऊस कमी तर पिके सर्वसाधारण सांगितले असल्याने शेतकऱ्यांना यंदा फारशी चांगली भविष्यवाणी नसल्याचे दिसून आले. पिक परिस्थिती सर्वसाधारण सांगितले असून पाऊसही सर्वसाधारण आणि लहरी स्वरूपाचा सांगितलेला आहे. ही भविष्यवाणी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज वाघ यांनी वर्तवली आहे.
पावसाची परिस्थिती पाहता जून महिन्यामध्ये साधारण पाऊस राहील. पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त, सार्वत्रिक पाऊस होणार नाही. दुसरा महिना चांगला पाऊस होईल. तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल. चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील. यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे. त्याचबरोबर कापूस, तूर, उडीद, मूग, गहू, हरभरा, इत्यादी पिके घेण्याचे सांगितले. त्यापैकी तूर आणि ज्वारी पिके चांगली येतील, असा अंदाज आहे.