Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी भुजबळांचा राज्यसरकारला पत्र

chagan bhujbal
, सोमवार, 9 जानेवारी 2023 (23:04 IST)
राज्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांनी  एक पत्र लिहून राज्य सरकार कडे इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सध्या  बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहार प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.अलीकडे बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना सुरु झाली आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांना राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झाला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची आमची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे.मागणी पूर्ण व्हाव्ही असे त्यांनी पत्रात लिहून दिले आहे. 
 
जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे.मात्र इतर मागासवर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मॉस्कोहून गोव्याला येणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची बातमी, विमानाची इमर्जन्सी लँडिंग